महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेवराईत वाळूने भरलेल्या हायवाची तहसीलदाराच्या खासगी गाडीला धडक

गेवराई तालुक्यात चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने तहसिलदाराच्या खासगी वाहनाला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संबंधित वाळू माफियावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हायवाने तहसीलदाराच्या खाजगी गाडीला दिली धडक
हायवाने तहसीलदाराच्या खाजगी गाडीला दिली धडक

By

Published : Jun 12, 2020, 6:44 PM IST

Updated : Jun 12, 2020, 6:58 PM IST

बीड - जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आजवर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू होती. मात्र, आता चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने बीडकडे निघालेल्या तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या स्विफ्ट गाडीला पाठीमागून धडक देऊन, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील गढीजवळ हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संबंधित वाळू माफियावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा आढळून आल्यानंतर तहसिलदार जाधवर यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतू, चालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली. तहसीलदार प्रशांत जाधवर यांची गाडी हायवाच्या समोर येताच हायवाच्या चालकाने स्विफ्टला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तहसिलदार जाधवर हे या अपघातातून बचावले असून गाडीचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रेखावार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तर, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून हायवा ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे. तर, घटनास्थळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे दाखल झाले असून सदर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, सध्या हायवा आणि तहसिलदार यांची गाडी ही ठाण्यात लावण्यात आली आहे.

Last Updated : Jun 12, 2020, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details