महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Newly Married Woman Suicide: लग्नाच्या तीन महिन्यातच प्रेमविवाहाचा दुर्देवी अंत; नवविवाहितेची आत्महत्या - आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी येथे प्रेमविवाह झालेल्या तरुणीने आपले जीवन संपवले आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी 20 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Newly Married Woman Suicide
नवविवाहितेची आत्महत्या

By

Published : Jun 23, 2023, 5:56 PM IST

Updated : Jun 23, 2023, 6:19 PM IST

बीड : आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी येथील आदेश चौधरी याच्यासोबत तीन महिन्यांपूर्वी लग्न केले होते. सासु, पती वारंवार त्रास देऊ लागल्याने पायल याला कंटाळली होती. पती नगरला तर सासु शेळ्या चारण्यासाठी गेल्याची संधी साधत तिने आत्महत्या केल्याची घटना 19 रोजी 6 च्या दरम्यान घडली. महिलेचा मामा दत्तात्रय लेकुरवाळे (रा. कुसडगांव, ता. जामखेड, जि.अहमदनगर) याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात आरोपी पती आदेश चौधरी, सासु अलका चौधरी, मावस ननंद मिना साबळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नवरा आणि सासूला अटक करण्यात आली असून मावस नणंद मिना साबळे हिला अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहेत.

मानसिक त्रासामुळे नवविवाहिता तणावात:मृत पायलच्या मामाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा नवरा आणि सासू हे दोघेही तिला माहेरी जाऊ देत नव्हते. तसेच तिचा वारंवार अपमान करायचे. पायलला तिची सासू, नवरा तसेच मावस ननंद हे मानसिक त्रास देत असल्याने ती सतत तणावात होती. यामुळे तिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर शासकीय रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अंत्यविधी पार पडला.

ठोंबळसांगवी गावात हळहळ:या घटनेनंतर पायलचे मामा दत्तात्रय लेकुरवाळे यांनी आंभोरा पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली आहे. अंभोरा पोलीस या घटनेचा तपास करीत आहे. नवविवाहितेने लग्नाच्या तीन महिन्यानंतर आत्महत्या केल्याने ठोंबळसांगवी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विवाहितेची या कारणाने आत्महत्या: मी एकत्रित कुटुंबात काम करत नाही, असे सुसाईड नोटमध्ये लिहून पती कुटुंबीयांपासून वेगळे राहत नसल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद येथील वाळूज परिसरात 22 जून, 2021 रोजी घडली आहे.

बेडरुम केली आत्महत्या :पपिता हिने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सासरा, दीर व पतीला जेवणाचा डबा करून दिला. सासू आणि नणंद या दोघी दहा महिन्यांच्या मुलीला झोपी घालत होत्या. तर पपिता ही बेडरूममध्ये होती. बराच वेळ झाला तरी पपिता बाहेर आली नाही. ती आवाजाला देखील प्रतिसाद देत नसल्याने शेवटी दोघींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी पपिताने आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिला बेशुद्धावस्थेत तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गोरख चव्हाण व मनिषा केदार करत आहेत.

Last Updated : Jun 23, 2023, 6:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details