बीड - हर हर महादेवचा गजर करत बीड जिल्ह्यातील शिवालये भाविकांनी गजबजून गेली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच भाविकांनी रीघ लावली होती. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिरात विविध अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. बीडमध्ये भाविकांनी सहकुटुंब कन्कलेश्वराचे दर्शन घेतले.
बीड जिल्हा ही संतांची भूमी आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तिभावाने महाशिवरात्र उत्सव साजरा करतात ग्रामीण भागांमध्ये ठिकठिकाणी पारायणे करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक आले होते. शुक्रवारी पहाटेपासूनच दर्शन रांगा पाहायला मिळाल्या, परळी येथील वैद्यनाथाची पूजा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता केली.