बीड -केज तालुक्यातील सोने सांगवी येथे घरातील गॅसचा अचानक भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असून, सासू-सुनेसह एक मुलगी यामध्ये जखमी झाली आहे. गॅस टाकी लीक झाल्याने हा भडका उडाल्याचे समोर आले आहे.
तीन जण जखमी
केज तालुक्यातील सोने सांगवी येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास विष्णू बाजीराव कणसे यांच्या घरातील गॅसचा अचानक भडका उडाला. गॅसने अचानक पेट घेतल्याने घरातील व्यक्तींची धावपळ झाली. दरम्यान, घरातील विष्णू कणसे यांच्या पत्नीने व सुनेने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. यामध्ये विष्णू यांची पत्नी, सासू व एक मुलगी यामध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले आहे.