बीड- माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या केसापुरी कॅम्प परिसरातील बंगल्यातून तीन लाखाची चोरी झाल्याची घटना सोमवारी समोर आली. या घटनेचा तपास माजलगाव पोलीस करत असून त्यांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या घरात चोरी; ३ लाखांवर चोरट्यांचा 'डल्ला' - घर
माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश सोळंकी यांच्या घरी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी ३ लाखाची रोकड लंपास केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माजलगाव जवळच केसापूरी शिवारात मंत्री प्रकाश सोळंके यांचा बंगला आहे. मागच्या ३ दिवसांपासून माजी मंत्री सोळंके व त्यांच्या पत्नी मंगल सोळंके यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन सोळंके यांच्या बेडरूममधील कपाटातून तीन लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोळंके यांच्या विश्वासू नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची माजलगाव पोलीस कसून चौकशी करत आहेत.
माजलगाव पोलिसांनी चौकशीसाठी सोळंके यांच्या बंगल्यावरील दोन नोकरांना ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.