बीड- केज तालुक्यात कवडगावमध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला शुक्रवारी आढळून आली. ही घटना हत्या की आत्महत्या याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
बीडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत शिक्षिका आढळली; हत्या की आत्महत्या? - हत्या
केज तालुक्यात कवडगावमध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक शिक्षिका आढळून आली.
राजश्री मुंडे (रा. कवडगाव ता. केज) असे शिक्षिकेचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री मुंडे या जवळबन येथील वस्तीशाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी कवडगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाला त्या गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कवडगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ही घटना हत्या की आत्महत्या याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत