महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बीडमध्ये पीक विम्यासाठी रास्तारोको - swabhimani shetkari sanghatna

2017-18 या वर्षातील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बीड येथे रास्तारोकाे करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बीड येथे रास्ता रोकाे करण्यात आला.

By

Published : Jul 23, 2019, 5:11 PM IST


बीड- गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. 2017-18 या वर्षातील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. गेवराई तालुक्यातील जातेगाव व तलवाडा हा भाग वगळता इतर गावांना पीक विमा देण्यात आला होता. म्हणून स्वाभिमानी तकरी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्रं 61 (माजलगाव ते गेवराई) या महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ एक तास रास्ता रोको करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बीड येथे रास्ता रोकाे करण्यात आला.
आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे प्रशासनाने सावध पावित्रा घेतला. खरीप पीक विमा हा गेवराई तालुक्यासाठी मंजुर झाला असून कोणतेही गाव यातून वगळले जाणार नाही. तसेच मागणी केलेल्या गावांमधील पीक विमा भरलेले शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाहीत, असे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सगळ्या मागण्या पुर्ण करु असे, लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तलवाडा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details