महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री साहेब जागे व्हा.. ओला दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानीने केली मागणी - राज्यात ओला दुष्काळ करण्याची मागणी

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. मात्र याकडे सरकारचे लक्ष नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

wet-drought-in-maharashtara
मुख्यमंत्री साहेब जागे व्हा.. ओला दुष्काळ जाहीर करा

By

Published : Oct 15, 2020, 9:43 AM IST

बीड- जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन व तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या वतीने 'मुख्यमंत्री साहेब जागे व्हा' च्या घोषणा देत आज आंदोलन केले. तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री साहेब जागे व्हा.. ओला दुष्काळ जाहीर करा
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातचा गेलेला आहे, अशा परिस्थितीत मायबाप सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे अपेक्षित आहे. मात्र हे सरकार शेतकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी या आंदोलनावेळी केला.

परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वात गेवराई येथे शेतकऱ्याच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांना जागे करण्यासाठी "मुख्यमंत्री जागे व्हा" अशा घोषणा देण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details