महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या - beed

सचिन मारुती शिंदे (वय २५ रा. होळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याने होळ शिवारातील श्रीकांत फुगारे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बीड 1

By

Published : Mar 12, 2019, 4:22 AM IST

बीड - पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या २५ वर्षीय तरुणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दहा वेळा पोलीस भरतीची प्रक्रिया करून देखील भरती होत नसल्याने, आलेल्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

सचिन मारुती शिंदे (वय २५रा. होळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याने होळ शिवारातील श्रीकांत फुगारे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. सचिन शिंदे यांच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

या घटनेची माहिती युसुफ वडगाव पोलीस ठाण्याला कळवून देखील तीन तास उशिराने पोलीस घटनास्थळी आल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला होता. याप्रकरणी अधिक तपास वडगाव पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details