महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साखर कारखान्याकडून शेतकरी वेठीस; उसाला एफआरपीप्रमाणे भाव नसल्याने उत्पादक हवालदिल

बीड जिल्ह्यात अजून किती ऊस उत्पादकांचे बळी घेणार? असा प्रश्न शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी उपस्थित केला आहे. थावरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना निवेदन देऊन ऊस उत्पादकांच्या मागणीवर गांभीर्याने विचार करण्याबाबत विनंती केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Apr 24, 2019, 1:02 PM IST

बीड -ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव मिळावा, यासाठी किसान संघर्ष समितीच्या वतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास १ मे रोजी कामगार दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी यांना बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी घेराव घालणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

साखर कारखान्याकडून शेतकरी वेठीस; उसाला एफआरपीप्रमाणे भाव नसल्याने उत्पादक हवालदिल


हंगाम सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे रक्कम द्यावी, असा आदेश आयुक्त पणे यांनी ३० जानेवारी २०१९ ला दिला. मात्र, बीड जिल्हायातील ऊस उत्पादकाक शेतकऱ्यांना आतापर्यंत एफ. आर. पी प्रमाणे ऊसाला भाव मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ऊस दिला, ते ऊस उत्पादक आधीच दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.


जिल्ह्यात ८ साखर कारखाने आहेत. यामध्ये काही अपवाद वगळता इतर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे उसाचे पैसे मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे साखर आयुक्तांनी आदेश देऊनही साखर कारखानदार साखर आयुक्तांचे आदेश पाळत नाहीत. ही गंभीर बाब आहे. उसाचे बिल मिळाले नाही म्हणून माजलगाव तालुक्यातील शेतकरी महारुद्र जाधव (रा. गोविंदवाडी तालुका माजलगाव) या शेतकऱ्याने ३ महिन्यापूर्वी विषप्राशन करून आत्महत्या केली.

बीड जिल्ह्यात अजून किती ऊस उत्पादकांचे बळी घेणार? असा प्रश्न शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी उपस्थित केला आहे. थावरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना निवेदन देऊन ऊस उत्पादकांच्या मागणीवर गांभीर्याने विचार करण्याबाबत विनंती केली आहे.


जिल्ह्यातील जय महेश शुगर इंडस्ट्रीज, माजलगाव, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी, माजलगाव सहकारी साखर कारखाना, तेलगाव, जय भवानी साखर कारखाना, गढी तालुका गेवराई या कारखान्यांना साखर आयुक्तांनी ३० जानेवारी २०१९ रोजी दिलेल्या आहेत. तरीदेखील अजूनपर्यंत त्यांना विचार करून शेतकऱ्यांना प्रमाणे उसाचे बिल मिळालेले नसल्याचे गंगाभिषण थावरे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की, आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांना 1 मे रोजी घेराव घालणार आहोत, अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details