महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात पेरणी पुरताच पाऊस; अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा

बीड जिल्ह्यात खरिपाची पेरणी सर्वाधिक होत असते. जिल्ह्यात खरीप पेरणी क्षेत्र 6 लाख 58 हजार हेक्टर आहे. यापैकी 17 टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली असल्याचा अंदाज कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बीड

By

Published : Jul 2, 2019, 4:59 PM IST

बीड- जिल्ह्यात पेरणी पुरता पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर याची पेरणी करत आहेत. अद्यापही बीड जिल्ह्यात मोठा पाऊस झालेला नाही. पेरणी पुरताच पाऊस पडला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. 18 जूननंतर बीड जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. मंगळवारी सकाळपर्यंत 73.8 मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात 17% पेरणी झाली आहे.

बीड जिल्ह्यात पेरणी पुरताच पाऊस; अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा

बीड जिल्ह्यात खरिपाची पेरणी सर्वाधिक होत असते. जिल्ह्यात खरीप पेरणी क्षेत्र 6 लाख 58 हजार हेक्टर आहे. यापैकी 17 टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली असल्याचा अंदाज कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उद्यापर्यंत पेरणी पूर्ण झालेली नसल्याने पेरणीचा नेमका आकडा समोर आलेला नाही. मात्र कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात 1 लाख 2 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस, तूर , सोयाबीन, उडीद या पिकांचा समावेश आहे. केवळ पेरणी पुरता पाऊस झालेला आहे. आजही बीड जिल्ह्यात 900 टँकरद्वारे साडेसातशे गावांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. बीड जिल्ह्यातील अनेक गावे टंचाईचा सावटाखाली आहेत. केवळ पेरणी पुरताच पाऊस असून मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. येणाऱ्या काळात चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने आम्ही पेरणी पूर्ण केली असल्याचे बीड तालुक्यातील शिदोड येथील शेतकरी संदीप खुरणे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील छावणी सध्या बंद आहेत. शेतकऱ्यांनी येथील मशागतीसाठी जनावरे शेतावर नेली आहेत. पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्याप पर्यंत जनावरांचा चारा तयार झालेला नाही. अशा परिस्थितीत छावणीवर जनावरे ठेवावीत तर शेतीतील मशागत होणार नाही. त्यामुळे विकतचा चारा घेऊन जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर केली असल्याचे चित्र देखील बीड जिल्ह्यात आहे. आता मोठा पाऊस केव्हा पडतो असे म्हणत बळीराजा ढगाकडे डोळे लावून बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details