महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन् हेलीकॉप्टर परत पाठवून शरद पवार चारा छावणीवर

आष्टी येथील सभा संपवून शरद पवार हेलीकॉप्टरने गेवराईकडे जाणार होते. मात्र, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी अचानक हेलीकॉप्टर परत पाठवून गाडीने प्रवास करत दुपारच्या रणरणत्या उन्हात चारा छावण्यांना भेटी देत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेताना शरद पवार

By

Published : Apr 14, 2019, 8:55 PM IST

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातत्याने शेतकऱ्यांसोबत असलेली आपली नाळ दाखवून देत असतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याचा रविवारी पुन्हा प्रत्यय आला. आष्टी येथील सभा संपवून शरद पवार हेलीकॉप्टरने गेवराईकडे जाणार होते. मात्र, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी अचानक हेलीकॉप्टर परत पाठवून गाडीने प्रवास करत दुपारच्या रणरणत्या उन्हात चारा छावण्यांना भेटी देत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

रविवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार बीड जिल्ह्यात होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आष्टी येथील सभा संपवून शरद पवार हेलीकॉप्टरने गेवराईला येऊन काही तास विश्राम करणार होते. त्यानुसार सारी तयारी झाली होती. हेलीकॉप्टरदेखील सज्ज होते. मात्र आष्टीतिल सभा संपताच शरद पवारांनी या जिल्ह्यात आलोय तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे, असे सांगत गाडीतून गेवराईला जाण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर परत पाठवून पवार वाहनाने भर दुपारी धामनगावच्या छावणीवर पोहोचले. रणरणत्या उन्हात त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या.

गोपीनाथ मुंडेंची आठवण...

शरद पवारांच्या छावणी भेटीने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण जिल्ह्याला झाल्याशिवाय राहिली नाही. यापूर्वी जिल्ह्यात दुष्काळ पडल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी छावणीवर मुक्काम करत शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details