दोन चिमुकल्या बालिकांवर लैंगिक अत्याचार, परळी तालुक्यात घटनेने खळबळ - beed police news
दोन चिमुकल्या बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बीड - तालुक्यातील सिरसाळा येथे दोन अल्पवयीन बालिकांवर लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना घडली आहे. हा प्रकार आठ ते दहा दिवसा पुर्वीच घडला असल्याचे पिडिताच्या नातेवाईकाने सांगितले आहे. प्रकार होऊन आठ ते दहा झाले परंतु या प्रकरणा बद्दल भितीमुळे पिडित मुलींनी घरच्यांना सांगीतले नव्हते. रविवारी या प्रकारा बाबत पिडित दोघी मुलींनी आईला सांगितले व प्रकार समोर आला. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरसाळा पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलींच्या वडिलांनी आपल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे कि,आपली एक मुलगी ७ वर्षाची आहे व एक ८ वर्षाची आहे. दोघींना घराशेजारीच राहणाऱ्या आरोपी घरात नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे, अश्लील कृत्य केले. दोन्ही चिमुकल्या मुलींशी अत्यंत गैर वर्तन केले आहे. पिडित मुलींनी कुणालाही काही सांगू नये म्हणून त्यांना धमकावले. म्हणून हा प्रकार इतके दिवस उघड झाला नव्हता. अखेर पिडित मुलींनी घरी सांगीतल्याने घटना उघड झाली. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात कलम ३७६ अ,ब,३५४ अ,बाल अत्याचार अधिनियम ४/ ८/१२ पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह पोलिस निरिक्षक श्रीकांत डोंगरे पाटील अधिक तपास करत आहेत. आरोपी फरार आहे.