बीड - देशातील कट्टर हिंदुत्ववादी संघटनांना मुस्लीम व हिंदू यांच्यात वाद लावून द्यायचा होता. पण इथे संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आला. खरे तर मोदी व शहा यांना मुस्लीम समाजाला अस्वस्थ करायचे होते, पण इथे उलटे झाले, संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आला आहे. ही लढाई केवळ 'सीएए' व 'एनआरसी'च्या विरोधात नाही तर आंबेडकर विरुद्ध गोळवलकर, अशी आहे. ही बीडची 'संविधान बचाव महासभा' या आंदोलनाला बळ देईल, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी मंचावरील मान्यवरांनी बोलताना सांगितले की, हा देश संविधानाच्या मार्गावर चालणार आहे. त्यामुळे मोदी व शहा यांचे नापाक इरादे देश मोडून काढेल, असा सूर बीड येथील संविधान बचाव महासभेत उमटला. बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे संविधान बचाव महासभा झाली. यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुस्लीम लॉ बोर्डचे मौलाना रहमानी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, समाजसेविका तिस्टा सेटलवाड, जेएनयू विद्यार्थिनी दिपसीता धर यांची उपस्थिती होती.
हेही वाचा -संगीताचा संघर्ष; पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने उभा केला व्यवसाय