महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधान परिषद : महाविकास आघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे परळीतून विधानसभेवर निवडून गेले. यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर, बीड जिल्ह्यातीलच काँग्रेसचे संजय दौंड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

sanjay dound
संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : Jan 14, 2020, 2:33 PM IST

Updated : Jan 14, 2020, 3:16 PM IST

बीड -परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या विधान परिषदेतील रिक्त जागेवर महाविकास आघाडीकडून संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दौंड यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. मुंडे यांना निवडून आणण्यात संजय दौंड यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. यामुळेच बीडमधून दौंड यांना राष्ट्रवादीने हक्काची जागा दिली आहे.

महाविकास आघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा... मुंबई शेअर बाजाराचा विक्रमी निर्देशांक; गाठला ४१,९०० चा टप्पा

संजय दौंड यांच्या मदतीची परतफेड म्हणून स्वतः शरद पवार यांनी रिक्त जागेवर दौंड यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता संजय दौंड यांच्या रुपाने बीडला आणखी एक आमदार मिळणार आहे. मात्र, दौंड यांच्या आमदारकीमुळे बीड-परळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

हेही वाचा... 'लेखक-प्रकाशकाने पुस्तक मागे घेतले'... जावडेकरांची सारवासारव

1990 पासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असणारे संजय दौंड यांचा परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत राहुन त्यांनी धनंजय मुंडेंना मदत केली. सध्या त्यांच्या पत्नी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड हे मंत्री होते. संजय दौंड हे जरी काँग्रेसमध्ये असले, तरी दौंड कुटुंबीय आणि शरद पवार यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर बीड जिल्ह्यातून संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे.

संजय दौंड आणि धनंजय मुंडे

हेही वाचा... 'तुमच्या सगळ्यांचा बाप आला'...सोलापूर शिवसेनेत पुन्हा 'फ्लेक्स वॉर'

कोण आहेत संजय दौंड ?

स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेत उमेदवारी दिल्याने, धनंजय मुंडेंच्या विधान परिषदेच्या रिक्त जागेवर संजय दौंड यांचा विजय निश्चित मानला आहे. गेली अकरा वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विविध पदावर संजय दौंड यांनी काम केले आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी व पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटात संजय दौंड यांचा चांगलाच जनसंपर्क आहे. मार्केट कमिटी सदस्य म्हणून संजय दौंड यांनी पाच वर्ष काम केलेले आहे. याशिवाय त्यांच्या पत्नी आशाताई दौंड या पाच वर्ष जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा होत्या.

Last Updated : Jan 14, 2020, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details