आष्टी (बीड) - कोरोनाच्या भयान काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समर्थपणे आपली बाजू संभाळल्यानेच आज आपण हे जग पाहत अहोत. अशा निस्वार्थपणे सेवा बजविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचा-यांचे कौतुक करण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचे युवानेते अभयराजे भीमसेन धोंडे यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राचे काम उल्लेखनीय - अभयराजे धोंडे - बीड
कोरोनाच्या भयान काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समर्थपणे आपली बाजू संभाळल्यानेच आज आपण हे जग पाहत अहोत. अशा निस्वार्थपणे सेवा बजविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचा-यांचे कौतुक करण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचे युवानेते अभयराजे भीमसेन धोंडे यांनी म्हटले आहे.
आष्टी येथील माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांना एक वेळचे जेवण देण्यात येत होते. आता कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने या सेवेचा आज समारोप करून कोरोनाकाळात सेवा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मानही आज दि. 15 रोजी सकाळी 11 वाजता युवानेते अभयराजे धोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.राहूल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामदास मोराळे, डाॅ. पाटील, डाॅ. अमित डोके, डाॅ. निखील गायकवाड, डाॅ.नागेश करांडे, भाजपाचे तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभय धोंडे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून देशासह जगावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. या संकटाला आपल्या कुटूंबाचा कसलाही विचार न करता रात्रंदिवस रूग्णांची सेवा करणा-या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना सारख्या भयाण रोगाला हरविण्यात मोलाचा वाटा आहे. एकादा चुकीचे काम करणा-या वैद्यकीय कर्मचा-यांमुळे सगळ्याच कर्मचा-यांना दोषी न ठरविता सामाजाने या वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. तसेच गेल्या दोन अडीच महिन्यापासून माजी आ.भीमसेन धोंडे यांच्यावतीने आम्ही आष्टी,पाटोदा व शिरूर येथील कोव्हीड रूग्णांलयात रूग्णांना एकवेळेसचे जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. आज कोरोनाची संख्या कमी झाल्याने ही सेवा बंद करण्यात येत आहे. परंतु माजी आ.भीमसेन धोंडे यांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रम असेच सुरू ठेवणार असल्याचेही अभयराजे धोंडे यांनी सांगितले.