बीड - जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात अपघातात जखमी झालेला रुग्ण आणला असता, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावला असल्याचे म्हणत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात शनिवारी रात्री गोंधळ घातला. तसेच कर्मचाऱ्यांना दमदाटी करत मारहाण केली.
रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईकांची रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण, बीडमधील घटना - Relatives beat hospital staff
अपघातात जखमी झालेला रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप..
हेही वाचा... गोंदियात मैत्रीच्या नात्याला कलंक; धारदार चाकूने मित्राचा खून
शेख अमीर (35) याचा नगर रोडवर दुचाकी घसरून अपघात झाला होता. त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात शनिवारी रात्री दाखल करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आपला रुग्ण दगावला असल्याने नातेवाईक संतप्त झाले. डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले नाही, असे म्हणत जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मृताच्या नातेवाईकाने मारहाण केली. रुग्णालयातील खुर्च्या व स्ट्रेचर फेकून देण्याचा प्रकार देखील संतप्त नातेवाईकांनी केला. यामुळे बीड पोलिसांना जिल्हा रुग्णालयात पाचारण करण्यात आले. या घटनेचा डॉक्टर असोसिएशनकडून निषेध करण्यात येत असून रविवारी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.