महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : रस्त्याने एकटीच चाललेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पिंपळनेरची घटना - जिल्हा अधिक्षक कार्यालय

देशभरात मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेसोबतच एकूण समाज व्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे

Beed
जिल्हा अधिक्षक कार्यालय

By

Published : Dec 9, 2019, 12:41 PM IST

बीड - एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे समोर आली आहे. यासंबंधी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. त्याला लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस सहाय्यक निरीक्षक शरद भुतेकर यांनी दिले.


पिंपळनेर येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीचे आई वडील ऊसतोडणीसाठी गेले होते. ती आजी आजोबांसोबत राहत होती. एकेदिवशी ती रस्त्याने चालत असताना आरोपीने तिला जबरदस्ती घरात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हेही वाचा -धक्कादायक..! भिवंडीत नराधम बापाचा अत्याचार, अल्पवयीन मुलगी गर्भवती

त्यानंतर तिचे पोट दुखू लागल्याने आरोपीनेच बीड येथे उपचारासाठी दाखल केले होते. आई-वडील कारखान्याहून गावी परतल्यानंतर पीडित मुलीला घेऊन पिपंळनेर पोलीस ठाण्यात आरोपी ज्ञानेश्वर संपत मोमीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला लवकरच जेरबंद करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. पण, अजून आरोपीला अटक करण्यात आले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details