बीड - लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या संपत्तीची माहिती हा एक राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय असतो. बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या संपत्तीत पाच वर्षात दोन कोटीची वाढ झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांची एकूण संपत्ती ११ कोटी आहे.
प्रीतम मुंडे यांच्या संपत्तीत दोन कोटीची वाढ
प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव आणि शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांच्या मालमत्ता मात्र अवघ्या काही लाखाच्या घरात आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांची मालमत्ता देखील काही लाखांमध्ये असल्याचे घोषणा पत्रातून समोर आले आहे. राजकारणातील नेत्यांच्या संपत्ती कोटी कोटीच्या घरात आहेत. यामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संपत्तीच्या बाबतीत आघाडीवर आहेत. यामध्ये प्रीतम मुंडे यांनी घोषणापत्रात व्यवसाय शेती दाखवला आहे. त्यांचे पती व्यावसायिक असल्याचे नमूद केले आहे. शेती व पतीच्या व्यवसायातून प्रीतम मुंडे यांची ५ वर्षात २ कोटीने संपत्तीत वाढ झाली आहे. बीड लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये तिघे जण करोडपती आहेत. यामध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे यांची स्थावर जंगम मालमत्ता १६ कोटी ६४ लाख आहे विशेष म्हणजे यात स्वतः प्रीतम मुंडे आणि त्यांचे पती गौरव खाडे यांच्या मालमत्तेचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांची ११ कोटीच्या घरात स्थावर मालमत्ता आहे. अपक्ष उमेदवार म्हणून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले राजेंद्र जगताप यांची संपत्ती ३ कोटी आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार सोनवणे यांच्याकडे पत्नी आणि ३ अपत्त्यांची मिळून १० कोटी ५३ लाखांची मालमत्ता आहे तर हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून असलेल्या मालमत्तेतील वारसा प्राप्त रक्कम चाळीस लाखांची आहे. बजरंग सोनवणे देखील ११ कोटीच्या मालमत्तेचे धनी आहेत.
असे आहेत संपत्तीचे आकडे- प्रीतम मुंडे- बँकेत रोख रक्कम ४५ लाख ६१ हजार ९२९ रुपये हातातील रोख रक्कम ३ लाख ७० हजार १२५ रुपये मुदत ठेवी पाच लाख २८ हजार १५२ रुपये शेअर्स एक कोटी ७२ लाख ७२ हजार ५६९ सोने १०० ग्रॅम किंमत ३ लाख २० हजार चांदी पाच किलो किंमत एक लाख ९२ हजार पाचशे रुपये दागिने ८ लाख जंगम मालमत्ता १० कोटी ४७ लाख ७० हजार नऊशे एकोणपन्नास स्थावर मालमत्ता तीन कोटी ८७ लाख ४८ हजार ६५४ रुपये कर्ज ८ कोटी ६२ लाख ७७ हजार ७९४ रुपये याशिवाय डॉक्टर प्रीतम मुंडे यांचे पती गौरव खाडे यांची एकूण संपत्ती हातातील रोख रक्कम पाच लाख ९५ हजार ९३९ रुपये एवढी आहे. बँकेत रोख रक्कम पाच लाख ९५ हजार ९३९ रुपये जंगम मालमत्ता दोन कोटी २१ लाख २ हजार ३२३ रुपये एवढी आहे स्थावर मालमत्ता १८ लाख ५६ हजार रोकड १ कोटी २५ लाख ५६ हजार एवढे कर्ज आहे. वाहन ऑडी कार किंमत २२ लाख एवढी आहे. बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांची संपत्ती
पुढीलप्रमाणे- जंगम मालमत्ता दोन कोटी ५२ लाख ११ हजार ४०९ स्थावर मालमत्ता एक कोटी ६३ लाख कर्ज ६४ लाख २३ हजार ३०१ त्यांची पत्नी सारिका सोनवणे यांची संपत्ती जंगम मालमत्ता एक कोटी १२ लाख ३६ हजार स्थावर मालमत्ता ५८ लाख पन्नास हजार कर्ज १४ लाख ३९ हजार आठशे एक रुपये वाहन एक स्कार्पिओ तीन ट्रॅक्टर किंमत तीन लाख ७५ हजार तर एक टँकर १५ लाख ३४ हजार ९९६ रुपये.