बीड- अंबाजोगाईमध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम दिगंबर वारकड, क्रीडा शिक्षक (वय 43) असे या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा -जिल्हा परिषदेची सत्ता राखण्यासाठी पंकजा मुंडेंचा पुढाकार; मंगळवारी बीडमध्ये घेतली बैठक
याबाबत अधिक माहिती अशी की, एका विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर याच शाळेतील क्रीडा शिक्षकाने बलात्कार केला. क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ही मुलगी शिक्षकासोबत बाहेरगावी गेली होती. स्पर्धेतून परतत असताना वाहनामध्ये शिक्षकाने तिच्यासोबत छेडछाड केली आणि नंतर अंबाजोगाई येथे वाहनामध्येच 17 ऑक्टोबरला तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणालाही सांगू नकोस, असे शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकावले होते. त्यानंतर त्या मुलीवर नराधम शिक्षकाने अनेक वेळा अत्याचार केल्याचेही समोर आले आहे.
हेही वाचा -बीडमध्ये पोलीसाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
पीडित मुलगी भयभीत अवस्थेमध्ये होती. तिची अवस्था शाळेमधील एका महिला शिक्षकेच्या लक्षात आल्यानंतर तिने विद्यार्थीनीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर या घटनेचे बिंग फुटले. त्या मुलीने अंबाजोगाई शहर पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास डीवायएसपी राहुल धस हे अधिक तपास करत आहेत.