बीड - जिल्ह्यातील परळी येथे एका अल्पवयीन मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. अशोक नगर भागात हा प्रकार घडला असून यातील आरोपी फरार झाला आहे. बाबुराव डोंगरे (रा.परळी अशोक नगर) असे आरोपीचे नाव आहे.
परळीत ५५ वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी फरार - बीड
जिल्ह्यातील परळी येथे एका अल्पवयीन मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
परळीत ५५ वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी फरार
परळीतील एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मुलीला घरी बोलावून अत्याचार केला. सदरील बालिकेने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मात्र, आईने बदनामीच्या भीतीने याबाबत कोठे वाच्यता केली नाही. परंतु, बुधवारी सकाळी मुलीने हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. त्यावेळी नगरसेवक किशोर पारधे यांनी पोलिसांना कळवून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मुलीच्या आईला धीर दिला.