आष्टी (बीड) - पायी चालत असलेल्या एका व्यक्तीचा दुचाकीच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.2) रात्री साडेसातच्या दरम्यान पांढरी गावाजवळ बीड अहमदनगर मार्गावर घडला.
भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू - पादचारी टार
पायी चालत असलेल्या एका व्यक्तीचा दुचाकीच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला.

याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवार सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान आष्टी येथील दशरथ सोमीनाथ विटकर (वय 40 वडार गल्ली) हे बीड-अहमदनगर मार्गावरुन पायी जात होते. पांढरी गावाजवळ त्यांना जामखेडकडे जाणाऱ्या एका दुचाकीने क्रं. एमएच 42 एबी 2924 जोरदार धडक दिली. यात दशरथ विटकर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात शिवराम सोमनाथ विटकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.ह.बन्सीधर जायभाय हे करत आहेत.