बीड - सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान परमेश्वर बाळासाहेब जाधवर यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील घागरवाडा या छोट्याशा गावातील मूळचे रहिवासी असलेले जाधवर हे राजस्थानमध्ये सीमावर्ती भागात तैनात होते. या घटनेची माहिती मिळताच घागरवडा गावावर शोककळा पसरली आहे.
बीडचे सुपुत्र परमेश्वर जाधवरला कर्तव्य बजावताना वीरमरण
परमेश्वर जाधवर (वय २५) हे बीएसएफमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी रुजू झाले होते. राजस्थानमध्ये सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. या दरम्यानच त्यांना वीरमरण आले.
हेही वाचा -बीड जिल्हा प्रशासनाचा कौतूकास्पद उपक्रम , थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली ज्वारीची पेरणी
या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की, परमेश्वर जाधवर (वय २५) हे बीएसएफमध्ये गेल्या ५ वर्षांपूर्वी रुजू झाले होते. राजस्थानमध्ये सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. या दरम्यानच त्यांना वीरमरण आले. हे वृत्त मंगळवारी रात्री १० वाजता समजताच घागरवडा गावावर शोककळा पसरली आहे. परमेश्वर हे अत्यंत गरीब आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील होतकरू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन लहान भाऊ,पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.