परळी (बीड) - जिल्ह्यात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. त्याप्रमाणे परळीत 1 मे रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, या दिवशी लस न घेतलेल्या एका महिलेला लास घेतले असल्याचे प्रमाणापत्र देण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी नगरसेवक प्रवीण मुंडे यांनी केली आहे.
परळीत कोविड लस न घेताच महिलेला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र
महिलेची त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने 29 एप्रिल रोजी व्यवस्थित नाव नोंदणी करण्यायात आली. त्यानंतर तिला लसीकरणासाठी 1 मे ला वेळ देण्यात आला होता. मात्र नियोजित दिवशी म्हणजे 1 मे ला पांचाळ या लस घेण्यासाठी गेल्या असता, त्यांच्या नावाने यापूर्वीच लस कोणीतरी अन्य व्यक्तीने घेतल्याचा प्रकार समोर आ
परळीत महाराष्ट्र सत्यभामा आत्माराम पांचाळ (वय 59 रा.किर्तीनागर ) ही महिला खंडोबा नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेली असता त्या महिलेची त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने 29 एप्रिल रोजी व्यवस्थित नाव नोंदणी करण्यायात आली. त्यानंतर तिला लसीकरणासाठी 1 मे ला वेळ देण्यात आला होता. मात्र नियोजित दिवशी म्हणजे 1 मे ला पांचाळ या लस घेण्यासाठी गेल्या असता, त्यांच्या नावाने यापूर्वीच लस कोणीतरी अन्य व्यक्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला. त्यासंबंधी त्या महिलेला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र 1 मे रोजी दुपारी मेसेजवरून मिळाले.
लस देण्यात होणारा हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. वयोवृद्ध नागरिक लसीच्या डोससाठी तासंनतास रांगेत उभा राहात असून त्यांची लस जर इतर कोणी घेत असेल तर ही बाब गंभीर आहे. या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी सदरील घटनेबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नगरसेवक प्रा मुंडे यांनी केली आहे.