बीड -परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण भावात अटीतटीची लढत सुरू आहे. एक दुसऱ्यावर वार पलटवार होऊ लागले आहेत. मतदारसंघातील घाटनांदुर येथील एका कॉर्नर बैठकीत बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावताना एक जोरदार विधान केले आहे. 'मोदीच काय ट्रम्प जरी परळीत आणला तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही', असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल', चिमूर मतदारसंघातील खेड येथील घटना
ज्या दिवशी आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या दिवसापासून भाजपने माझी धास्ती घेतली आहे. त्यामुळेच परळीमध्ये नरेंद्र मोदींची सभा लावली आहे. पण परळीमध्ये नरेंद्र मोदीच काय अमेरिकेचे ट्रम्प जरी आले तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना लगावला आहे.