महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चेअरमनपदी पंकजा मुंडे - Pankaja Munde elected Chairman

बीडच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चेअरमनपदी पंकजा मुंडे यांचीच वर्णी लागली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची निवड झाली आहे.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

By

Published : Jun 19, 2023, 10:49 PM IST

बीड -परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्यात. यावेळी चेअरमनपदी पंकजा मुंडे तर व्हाईस चेअरमनपदी धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व होते. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर या कारखान्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांनी सांभाळली. मात्र पुन्हा एकदा या वैजनाथ साखर कारखाना पांगरीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यात भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक पार पाडत संचालक म्हणून पंकजा मुंडे पुन्हा एकदा चेअरमन या पदावर विराजमान झाल्या आहेत. तर व्हाईस चेअरमन पदी धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची निवड झाली आहे.

या निवडणुकीत धनंजय मुंडे गटाचे 10 उमेदवार तर पंकजा मुंडे यांचे 11 उमेदवार अशी बांधणी करत पंकजा मुंडे यांच्या हाती वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा पुन्हा देण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजता चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. चेअरमन पदासाठी पंकजा मुंडे यांचा एकमेव अर्ज आल्यानंतर त्यांची निवड घोषित केली. आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे चंद्रकांत कराड यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. सर्व संचालक उपस्थित होते. त्याचबरोबर आतापर्यंतचा बहिणी विरोधात भाऊ असा वाद जो आहे या निवडणुकी नंतर त्यावर कुठेतरी पडदा पडल्याचे पाहायला मिळत आहे.

आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशीच परळीत परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र या निवडणुकीत दोन्ही बहिण भावाचे प्रेम पाहायला मिळाले. यात बहिणीसाठी कुठेतरी एक पाऊल बंधू धनंजय मुंडे यांनी मागे घेतलेले पाहायला मिळतेय. अनेक वर्षांपासून वैद्यनाथ साखर कारखान्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा साखर कारखान्याची धुरा त्यांच्याच हाती देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details