बीड - गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. याप्रसंगी 'आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. भाजपला विरोधी पक्षात असण्याचा अनुभव आहे. आंदोलने करण्यात आमचा पक्षदेखील कमी नाही' अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
'आता आम्ही विरोधी पक्षात, आंदोलने करण्यात आमचा पक्षही मागे नाही'
पंकजा मुंडे यांनी 27 तारखेला मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. यावर, मुंडे यांनी हाक दिल्यावर आम्ही आंदोलनासाठी पुढे सरसावू, असे धस यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -' ..त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार, अन् वरिष्ठ नेते त्यांची नाराजी दुर्लक्षित करणार नाहीत'
पंकजा मुंडे यांनी 27 तारखेला मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. यावर, मुंडे यांनी हाक दिल्यावर आम्ही आंदोलनासाठी पुढे सरसावू, असे धस यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या जडणघडणीत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा सहभाग राहिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी पक्ष सोडण्याचा प्रश्नच नसल्याचेही धस यांनी यावेळी म्हटले आहे.