महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये अनैतिक संबंधातून खून, तीन आरोपी गजाआड - गजाआड

जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात धामणगाव जवळ एका विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसांनी तपास केला असून हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे समोर आले आहे.

बीडमध्ये अनैतिक संबंधातून खून, तीन आरोपी गजाआड

By

Published : May 6, 2019, 10:09 PM IST

बीड- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात धामणगाव जवळ एका विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसांनी तपास केला असून हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आंबोरा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे नगर बीड मार्गावर २४ एप्रिलला एका युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीस तपासात युवकाची ओळख नितीन रामा पाबळे (रा. कडा वय- २२), अशी झाली होती. या युवकाचे एका विवाहितेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विवाहितेचा पती, मेहुणा, व इतरांनी मिळून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत टाकला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व यशवंत बारवकर यांनी या खुनाचे रहस्य उलगडून गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणात आंबोरा पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. तपासाच्या कारणामुळे अटक आरोपी व एकूण आरोपींच्या नावाविषयी गोपनीयता पाळण्यात आली आहे. या प्रकरणी आंबोरा पोलिसांशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details