महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडकरांना दिलासा..! 118 पैकी 116 अहवाल निगेटिव्ह, तर दोन अहवाल प्रतीक्षेत - बीडकरांना दिलासा

शुक्रवारी जिल्हा आरोग्य विभागाने पाठवलेल्या 118 अहवालातील 116 अहवाल निगेटिव्ह, तर 2 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. या अहवालामुळे बीडकरांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. आज घडीला बीड जिल्ह्यात एकूण 51 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बीडकरांना दिलासा..! 118 पैकी 116 अहवाल निगेटिव्ह तर दोन अहवाल प्रतीक्षेत
बीडकरांना दिलासा..! 118 पैकी 116 अहवाल निगेटिव्ह तर दोन अहवाल प्रतीक्षेत

By

Published : May 29, 2020, 11:17 PM IST

बीड - जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पाठविलेल्या 118 जणांचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. 118 पैकी 116 अहवाल कोरोना निगेटिव्ह तर दोन अहवाल प्रलंबित आहेत. शुक्रवारचा कोरोना रुग्ण अहवाल पाहता बीडकरांना दिलासा मिळाला आहे. आज घडीला जिल्ह्यात एकूण 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील आठवडाभरात बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले होते. विशेष म्हणजे मुंबई-पुणे येथून बीड जिल्ह्यात आलेल्या नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याने परिस्थिती धोकादायक निर्माण झाली होती. मात्र, शुक्रवारी जिल्हा आरोग्य विभागाने पाठवलेल्या 118 अहवालातील 116 अहवाल निगेटिव्ह तर 2 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. या अहवालामुळे बीडकरांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. आज घडीला बीड जिल्ह्यात एकूण 51 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या बीड परिसरातील बारा गावांमध्ये संचारबंदी लागू केलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details