बीड- येथील वासनवाडी परिसरात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी कल्पेश पवने याला आज रविवारी (दि. २८) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ दिवसांची म्हणजेच ३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील इतर २ आरोपींना तात्पुरते स्थानबद्ध करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
बीड जवळील वासनवाडी येथे शनिवारी एकाच कुटुंबातील ३ भावांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी किसन पवने, कल्पेश पवने आणि डॉ. सचिन पवने यांना अटक केली होती. यातील कल्पेश पवनेला रविवारी दहावे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कदिर अहमद सरवरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी भास्कर सावंत यांनी आरोपीला १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीच्या वतिने विधिज्ञ शहाजी जगताप यांनी पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध करत इतकी प्रदिर्घ पोलीस कोठडी आवश्यक नसल्याचे सांगितले. तसेच आरोपीला वैद्यकिय मदतीची गरज असल्याचे सांगितले. यावर तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला रुग्णालयातून सुटी झाली असून गरज पडल्यास पुन्हा तपासणी करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगिलते. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी कल्पेशला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दोघांची तात्पुरती स्थानबद्धता