महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या भीतीने पाटोदा तालुक्यातील 65 वर्षीय वृद्धाची आत्महत्या - beed suicide news

कोरोनाच्या भीतीने 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी गावात घडली आहे.

old man suicide fear of corona
कोरोनाच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या

By

Published : Jun 5, 2020, 10:03 AM IST

बीड- मी कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्या करत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही,अशी चिठ्ठी लिहून एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीने स्वतःचे जीवन संपवले आहे. चिठ्ठीमधील मजकुरामुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. आसाराम पोटे यांची तब्येत ठणठणीत होती. मात्र,कोरोना संबंधी होत असलेली चर्चा ऐकून भयभीत होऊन त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आले आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.

विशेष म्हणजे आसाराम यांनी गेल्या काही दिवसात कोठेही प्रवास केलेला नव्हता. ते नवीन व्यक्तीच्याही ते संपर्कात आले नव्हते.

दरम्यान, या घटनेविषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक कृष्णा डोके हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details