महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : दुचाकीला ट्रकची पाठीमागून जोरदार धडक, नऊ वर्षीय चिमुकली जागीच ठार - बीड मध्ये दुचाकी ट्रकअपघात

बीड शहरातील राष्ट्रवादी भवन समोर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात नऊ वर्षाची चिमुकली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली.

beed accident
beed accident

By

Published : Feb 13, 2021, 5:39 PM IST

बीड -शहरातील राष्ट्रवादी भवन समोर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात नऊ वर्षाची चिमुकली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. किमया अमर देशमुख (वय 9) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, कृषी कार्यालयातील सेवा निवृत्त कृषी सहाय्यक उद्धवराव चंदनशिव हे आपल्या नातीला घेऊन वायबटवाडी येथे हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन समोर अपघात झाला. या अपघातात किमया या नऊ वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरातून अवजड वाहतूक बंद असताना कंटेनर शहरात आलेच कसे? असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत. ट्राफिक पोलिसांकडून या गाडीला अडवले गेले नाही, ट्राफिक पोलीस करते तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीड शहरातील खड्डे आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे सामान्य नागरिकांचे जीव जात असताना नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे गप्प का? असा प्रश्न देखील सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. अनेक वेळा तक्रारी देऊनही शहरांतर्गत रस्त्याचे काम झाले नसून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. ते खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात घडत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांचा बळी नऊ वर्षांची चिमुकली गेली असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details