महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पतीच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; पळून जाऊन केला होता आंतरजातीय विवाह - beed news

पाच महिण्यापूर्वीच प्रिती आणि सचिनचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. प्रिती आणि सचिन कळसकर हे एकाच गावातील रहिवासी आहेत. सचिन हा गेवराई येथील एसटी आगारात नोकरी करतो. सचिन आणि प्रितीच्या प्रेमाला दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, पाच महिन्यांपूर्वी त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते.

newly-married-girl-committed-suicide-in-beed
newly-married-girl-committed-suicide-in-beed

By

Published : Feb 12, 2020, 11:07 PM IST

बीड- येथील गेवराई शहरातील भगवान नगर येथे पाच महिन्यांपूर्वीच आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पतीकडून होणाऱ्या शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून तीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. प्रिती सचिन कळसकर (वय २२ वर्षे रा.कुमशी ता. बीड) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

हेही वाचा-जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर परदेशी पथक, युरोपियन संघातील सदस्यांचाही समावेश

पाच महिण्यापूर्वीच प्रिती आणि सचिनचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. प्रिती आणि सचिन कळसकर हे एकाच गावातील रहिवासी आहेत. सचिन हा गेवराई येथील एसटी आगारात नोकरी करतो. सचिन आणि प्रितीच्या प्रेमाला दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, पाच महिन्यांपूर्वी त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते. तेंव्हापासून हे दोघेही गेवराई शहरातील भगवान नगर येथे एका भाड्याच्या घरामध्ये वास्तव्यास होते.

मी तुझ्याशी पळून जाऊन विवाह केला. त्यामुळे तू माहेरातून प्ला‌ॅट घेण्यासाठी १० लाख रुपये हुंडा घेऊन ये. म्हणून सचिन प्रितीचा छळ करत होता. दरम्यान, या त्रासाला कंटाळून प्रितीने गळफास लाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रितीच्या चुलत्यांनी तक्रार दिली आहे. यावरुन सचिन कळसकर विरोधात गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक मनिषा जोगदंड अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details