बीड- तालुक्यातील कपिलधार वाडी शिवारात एका बाभळीच्या झाडाखाली स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सापडलेल्या नवजात अर्भकाची निर्दयी आई कोण? याचा तपास बीड पोलीस करत असून बाळ बीड जिल्हा रुग्णालयात सुरक्षित आहे.
निर्दयी आई! कपिलधार वाडीत उघड्यावर आढळले स्त्री जातीचे नवजात बाळ - स्त्री जात
कपिलधार वाडी शिवारात एका बाभळीच्या झाडाखाली स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बीड शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर कपिलधारवाडी आहे. त्याठिकाणी सोमवारी सकाळी एका बाभळीच्या झाडाखाली बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा याची माहिती सकाळी शौचाला गेलेल्या लोकांनी ग्रामीण पोलिसांनी दिली. याच दरम्यान, गावातील महिलांनी त्या ठिकाणी जाऊन त्या बाळाला पाहिले.
बीड पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत गावातील महिलांनी त्या बाळाची काळजी घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत नवजात बाळ बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या स्वाधीन केले. त्या बाळाची प्रकृती उत्तम असून नवजात बाळाची आई कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.