बीडमध्ये आढळले 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये परळी येथील 5, शिरूर कासार तालुक्यातील राळेसांगवी 1, बीड शहरातील अजीज पुरा, डीपी रोड भागातील 2 तर अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 251 जणांचे कोरोना चाचणीसाठी पाठवले होते.
बीड- जिल्हा आरोग्य विभागाकडून शनिवारी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 251 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठवले होते. यापैकी 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर उर्वरित 242 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये परळी येथील 5, शिरूर कासार तालुक्यातील राळेसांगवी 1, बीड शहरातील अजीज पुरा, डीपी रोड भागातील 2 तर अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 251 जणांचे कोरोना चाचणीसाठी पाठवले होते. जिल्ह्यातील संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून बीड शहर 9 जुलै पर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतलेला आहे. बीड जिल्ह्यात आज घडीला एकूण 30 कोरना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.