महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरपंचाला बेदम मारहाण

पांडुरंग नागरगोजे हे पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी गावचे भाजपचे सरपंच आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

ncp activists beating sarpanch
सरपंचाला बेदम मारहाण

By

Published : Jan 22, 2020, 9:22 PM IST

Updated : Jan 23, 2020, 6:49 AM IST

बीड- पाटोदा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी रोहतवाडीचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना बेदम मारहाण केली घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत पांडुरंग नागरगोजे यांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरपंचाला बेदम मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग नागरगोजे हे पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी गावचे भाजपचे सरपंच आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचा आरोप पांडुरंग नागरगोजे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली होती, म्हणून मारहाण करण्यात आली, असा दावाही या कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट टाकून केला आहे. तसेच फेसबुकवर पोस्ट टाकून सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना धमकीही देण्यात आली आहे.

Last Updated : Jan 23, 2020, 6:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details