बीड - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या केज विधानसभा मतदार संघात मागील 8 दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. यात पृथ्वीराज साठेंना राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. साठे यांनी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी अर्ज दाखल केला, तर नमिता मुंदडा यांनी शुक्रवारी पावसामुळे शक्ती प्रदर्शन न करताच उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे नमिता मुंदडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संगीता ठोंबरेंच्या उपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
हेही वाचा -एक मिनिट उशीर झाल्याने 'या' उमेदवाराचा नाकारला अर्ज
राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून भाजपच्या तंबूत दाखल झालेले मुंदडा कुटुंबीय केज विधानसभा मतदारसंघातुन विधानसभा निवडणुक लढवत असल्याने त्यांची चर्चा राज्यभर होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी भाजपच्या नमिता मुंदडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पावसामुळे नमिता मुंदडा यांना शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करता आले नाही. त्यांनी शक्तिप्रदर्शन न करताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी पृथ्वीराज साठे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज केला.