महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 3, 2019, 7:54 AM IST

ETV Bharat / state

माझी लढाई परळीचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी - धनंजय मुंडे

आजपर्यंत परळीच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मीदेखील आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कुठल्याही विकास कामात राजकारण करण्याचा आमचा स्वभाव नाही. परळीच्या जनतेने आतापर्यंत आमच्या एका बहिणीला खासदार केले. एका बहिणीला आमदार, मंत्री केले. आता फक्त एकदाच मला संधी द्या, परळीचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवून देतो, असे आवाहन मुंडे यांनी केले.

परळी येथील कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे.

बीड - परळीचे वैभव असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे 'ज्योतिर्लिंग' हा असलेला दर्जा केंद्र सरकारने काढून घेतला. बारा ज्योतिर्लिंगमधून एक असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे स्थान परत मिळवण्यासाठी मला काम करायचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच माझी लढाई कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही, तर परळीचे हरवलेल्या वैभव परत मिळवण्यासाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते परळी शहरातील बालाजी मंदिर येथे मतदारांशी बोलत होते.

हेही वाचा -भाजप आमदार चरण वाघमारे यांनी कारागृहातूनच भरला उमेदवारी अर्ज

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, आजपर्यंत परळीच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मीदेखील आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कुठल्याही विकास कामात राजकारण करण्याचा आमचा स्वभाव नाही. परळीच्या जनतेने आतापर्यंत आमच्या एका बहिणीला खासदार केले. एका बहिणीला आमदार, मंत्री केले. आता फक्त एकदाच मला संधी द्या, परळीचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवून देतो, असे आवाहन मुंडे यांनी केले.

हेही वाचा -भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, संतोष मुंडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details