बीड- आष्टी शहरापासून सात किमी अंतरावर असलेल्या पोल फॅक्टरीजवळ चौसाळा तालुक्यातील लोणी वाकीवरून कांदा घेऊन जाणाऱ्या पिकअपने मोटार सायकलस्वारास धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला झाला आहे. हा अपघात आज सकाळी (शनिवार) झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कानिफ वांढरे (वय- 38) असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की बीड जिल्हयातील आष्टी शहरापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या पांढरी येथील कानिफ वांढरे आपल्या शेतातील पोल्ट्री फाॅर्मवर गेले होते. कानिफ वांढरे हे आपल्या मोटार सायकल (क्र.एम एच 23 ए यु 5180) ह्यावरून आपली पत्नी सोनाली कानिफ वांढरे (30) व मुलगी संस्कृती कानिफ वांढरे (9) हे घरी येत असताना पोल फॅक्टरीजवळ आले असता लोणी वाकी येथील शेतकऱ्यांचा कांदा पिकअप (एम एच 14 व्हि 909) यामध्ये अहमदनगर येथे घेऊन जात असताना समोरासमोर अपघात झाला.
जामखेड-नगर मार्गावर पिकअप व्हॅनच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार
जामखेड-नगर रोडवर आष्टी शहराजवळ कांदा वाहतूक करणाऱ्या पिकअपने मोटार सायकलस्वारास धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला झाला आहे.
कानिफ वांढरे
यामध्ये मोटार सायकलस्वार हा जागीच ठार झाला तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले असून, त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.