बीड- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (गुरूवार) ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून नोटीस देऊन कोहिनूर प्रकरणात त्यांना जाणीवपूर्वक गोवण्यात आले असल्याचे सांगत. बीड जिल्ह्यातील केज येथे मनसे कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई-मांजरसुंबा मार्ग अडवून टायरांची जाळपोळ केली. यावेळी हा मार्ग काही काळ ठप्प झाला होता. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे केज परिसर दणाणून गेला होता.
मनसे कार्यकर्त्यांची केजमध्ये जाळपोळ; कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी - मनसे
राज ठाकरे यांच्या ईडीकडून होणाऱ्या चौकशीच्या निषेधार्थ बीडमधील मनसैनिकांनी आंबाजोगाई-मांजरसुंबा मार्गावर टायर जाळले. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
रस्त्यावर जळणारे टायर
बीड जिल्ह्यातील केज येथील मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मनसेचे सुमन धस व कल्याण केदार यांचा आंदोलनामध्ये सहभाग होता. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व कारवाई करून सोडून दिले. अंबाजोगाई-मांजरसुंबा मार्गावर मनसे कार्यकर्त्यांनी टायर देखील जाळले.