बीड - तालुक्यातील नेकनूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. बलात्कारानंतर आरोपी फरार झाला असून नेकनूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मसाजोग येथील मुलगी आपल्या बहिणीच्या गावी बीड तालुक्यातील नेकनूर येथे आली असता येथे ही घटना घडली.
बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी फरार - बीड
तालुक्यातील नेकनूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. बलात्कारानंतर आरोपी फरार झाला असून नेकनूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मसाजोग येथील मुलगी आपल्या बहिणीच्या गावी बीड तालुक्यातील नेकनूर येथे आली असता येथे ही घटना घडली.
बीड
संजय रावसाहेब लोखंडे (वय 22 रा. नेकनूर) असे नराधम आरोपी नाव आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील अल्पवयीन मुलगी नेकनूर येथे आपल्या बहिणीच्या गावी आली होती. गुरुवारी मध्यरात्री ती लघुशंकेला उठली असता शेजारी राहणाऱ्या संजय लोखंडे याने अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी सध्या फरार असून नेकनूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.