बीड - बीडमध्ये बीएएमएस डॉक्टर मुलानेच बापाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंकुशनगर भागात राहणाऱ्या सुधीर सुरेश कुलकर्णी या मुलाने चक्क आपल्या बापाचा डोक्यात लोखंडी सळी मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाला डॉक्टर केलं पण मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी सळी घालून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुशनगरमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने बीड शहरामध्ये खळबळ उडाली आहे. आईच्या फिर्यादीवरून मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
doctor killed his father : डॉक्टर मुलानेच केला बापाचा खून, आईने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल - उच्चशिक्षित असून डोक्यावर परिणाम
डोक्यावर परिणाम झालेल्या डॉक्टर मुलानेच रात्री सळई डोक्यात घालून बापाचाच खून केल्याचा आरोप त्याच्या आईनेच केला आहे. बीडमध्ये यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मुलगा मानसिक त्रासात असल्याची माहिती पुढे आली आहे. (doctor killed his father)
उच्चशिक्षित असून डोक्यावर परिणाम - बीड शहरातील अंकुश नगर भागात राहणाऱ्या कुलकर्णी परिवारातील मुलगा सुधीर सुरेश कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएस मध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत होता. परंतु यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. यात त्याने आज मध्यरात्री जन्मदात्या बापाचा (सुरेश काशीनाथ कुलकर्णी वय 70) खून केला, अशी माहिती त्याचा आईनेच दिली आहे (doctor killed his father). घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. फिर्यादी सुरेखा कुलकर्णी वय 62 यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधीर कुलकर्णी वय 38 यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड व त्यांचे पथक करत आहे.
डॉक्टरने आपल्या बापाला का मारले -सुधीर कुलकर्णी या डॉक्टरने आपल्या बापाला का मारले असा प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेल. मात्र यामागची पार्श्वभूमीसुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सुधीर कुलकर्णी हा अत्यंत हुशार मुलगा होता आणि तो अनेकवेळा वर्गामध्ये पहिला यायचा. दहावीला त्याला ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले होते. त्यानंतर त्याला वडिलांनी वैद्यकीय शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी पाठवले आणि तो पुणे या ठिकाणीसुद्धा चांगल्या मार्काने पास झाला. तो एमबीबीएस झाल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला की तो गगनात मावत नव्हता आणि त्याच वेळेस त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यामुळे तो सतत रस्त्याने बडबड करत चालायचा आणि म्हणायचा की मी एमबीबीएस डॉक्टर आहे, कुणाला काही गोळी औषध लागले तर माझ्याकडून घ्या. याच नादात अनेक वर्ष निघून गेली. वडिलांनी मुलाला अनेक दवाखान्यामध्ये दाखवले अनेक औषध उपचार केले. मात्र त्याच्यावर कसलाही परिणाम झाला नाही. मांत्रिकांकडेही त्याला घेऊन गेले होते. मात्र त्याला फरक पडत नव्हता. अनेक दिवस मुलगा घरात बसून होता. मनाला वाटेल तो बोलायचा. तो वडील आई बाहेर गेले की रस्त्यावर फिरायचा. रस्त्यावर फिरत असताना अनेक वेळा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवायचा व म्हणायचा, 'मी एमबीबीएस डॉक्टर आहे मी तुम्हाला गोळ्या देऊ शकतो.' अनेक लोकांनी असे त्याला पाहिले आहे. मात्र काही दिवसानंतर त्याला जास्तच वेड लागले आणि तो चक्क नाल्यामधले कागदसुद्धा काढू लागला. काल रात्री त्याने बापाच्या डोक्यात सळी मारून त्याचा खून केल्याचे त्याच्या आईने सांगितले आहे.