बीड - प्रलंबित मराठा आरक्षणाच्या मागणीवर अखेर गुरुवारी उच्च न्यायालयाने निर्णय दिला. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयानंतर बीडमध्ये मराठा बांधवांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे मराठा समाजाच्या या आनंदात मुस्लिम बांधव देखील सहभागी झाल्याचे चित्र बीड येथे पहायला मिळाले. यावेळी मुस्लिम बांधवांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या.
बीडमध्ये मराठा समाजाचा जल्लोष; मुस्लिम बांधवांनी भरवले पेढे - आनंदोत्सवात
उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताच राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. बीड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी पेढे भरवत मराठा समाजातील बांधवांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात मूक मोर्चे काढले होते. न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताच राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. बीड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या आनंदोत्सवात मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी पेढे भरवत मराठा समाजातील बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध संघटना, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.