बीड :नारायण गड या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बारा वर्षाला एका शिवलिंगाची निर्मिती होते. या ठिकाणी जे संत महंत होऊन गेले, त्यांनी श्री शंभू महादेवाची तपश्चर्या या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी नारायण महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून मला साक्षात्कार दाखवा असे, आवाहन केले होते. त्यांनी साक्षात नारायण महाराज यांना दर्शन दिले. तसेच मी प्रत्येक बारा वर्षाला या ठिकाणी उत्पन्न होईल, हीच माझी ओळख असे महादेवाने त्यांना सांगितले होते. प्रत्येक बारा वर्षाला शिवलिंगाची निर्मिती आपोआप होते, अशी नारायण गडाची ओळख आहे.
जागृत देवस्थान :या गडावर आठ महंत होऊन गेलेले आहेत. या ठिकाणची जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षांची ही परंपरा आहे. ठिकाणावरून प्रत्येक आषाढी एकादशीला गेले. तीनशे वर्षांपासून दिंडी या ठिकाणावरून जात आहे. आता फाल्गुन वारीमध्ये नाथ षष्ठीला या ठिकाणावरून दिंडी जाते. ही अनादी वर्षाची परंपरा आजही चालू आहे. या ठिकाणी आषाढी एकादशीला तर फार मोठी गर्दीच असते. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नारायण गड हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
काय आहे आख्यायिका :या ठिकाणी पूर्वीचे भगवान शंकराचे मंदिर आहे. या ठिकाणी जे आठ महंत होऊन गेले आहेत. त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. बारा वर्षाला एक लिंग आपोआप तयार होते. हे या नारायणगडाचे महत्व आहे. या ठिकाणी येण्यासाठी कोणालाही आमंत्रण दिले जात नाही. या ठिकाणी भाविक आपोआप येतात. कार्तिक महिन्यामध्ये आठ दिवस या ठिकाणी यात्रा असते. आषाढी एकादशीला सुद्धा मोठ्या मनोभावे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.