बीड- डॉ. प्रीतम मुंडे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये संपत्तीची अपुरी माहिती दिली असल्याची तक्रार, शेतकरी संघटनेचे कालिदास आपटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, निवडणुक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आपटे यांनी याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली आहे.
'या' कारणामुळे प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला दिले आव्हान - Election Commission
डॉ. प्रीतम मुंडे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये संपत्तीची अपुरी माहिती दिली असल्याचे कारण सांगत आपटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांनी संपत्तीची माहिती देताना सासरकडील संपत्तीचा उल्लेख केलेला नाही. तसेच, त्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक असताना संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबींचे उमेदवारी अर्जामध्ये उल्लेख नसल्याचा आक्षेप घेत शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी निवडणूक आयोगाकडे मे महिण्यात तक्रार केली होती. दुर्दैवाने निवडणूक आयोगाने या प्रकरणात कारवाई केली नसल्याचे सांगत आपेट यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खा. मुंडे यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून त्यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे.