महाराष्ट्र

maharashtra

'इंदिरा गांधीनींही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला' मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

By

Published : Jan 29, 2020, 8:32 PM IST

Updated : Jan 29, 2020, 8:42 PM IST

एकेकाळी इंदिरा गांधींनी देखील देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता, असे वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. बीड येथे आयोजित संविधान बचाव महासभेत आव्हाड यांनी हे वक्तव्य केले.

jitendra avhad-indira gandhi
जितेंद्र आव्हाड-इंदिरा गांधी

बीड - 'एकेकाळी देशात इंदिरा गांधींनी देखील असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता', असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. बीड येथील संविधान बचाव महासभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी देशात आज ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. अनेक महाविद्यालयात हे हल्ले होत आहेत. हे सर्व अचानक का होत आहे ? असा सवालही उपस्थित केला.

मंत्री जितेंद्र आव्हाडांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य... बीड येथील सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड

हेही वाचा... संजय राऊतांचे I AM सॉरी ! इंदिरा गांधींबद्दलचे विधान घेतले मागे

'आज देशातील परिस्थिती पाहता, इंदिरा गांधींनीही असेच लोकशाहीचा गळा एकेकाळी घोटण्याचा प्रकार केला होता. देशात त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीबाबत बोलायला कोणीही तयार नव्हते. परंतु अहमदाबाद आणि पटना येथील विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी यांच्या धोरणाविरोधात आवाज उठवला. त्याचकाळात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल' असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एकही अपशब्द खपवून घेणार नाही; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना इशारा

जेव्हा देशातील आजची परिस्थिती बदलेल तेव्हा त्याचे श्रेय जेएनयु, हैद्राबाद यूनिवर्सिटी यांना द्यावे लागेल, असे आव्हाड यावेळी म्हणाले. आज विद्यार्थी बिनदिक्कतपणे बाहेर पडत आहेत. लोकांना कायदा समजावून सांगत आहेत. आज जरी त्यांची संख्या कमी असेल, तरिही हळूहळू ती वाढेल आणि हेच विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

Last Updated : Jan 29, 2020, 8:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details