बीड- राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. क्षीरसागर यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली.
जयदत्त क्षीरसागरांनी घेतली मंत्रीपदाची शपथ - शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
रविवारी शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या मंत्रीपदामुळे जिल्ह्यातील व मराठवाड्यातील विकासाचा 'बॅकलॉग' भरून काढण्याची नामी संधी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मिळाली आहे. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेते म्हणून विशेषतः जयदत्त क्षीरसागर यांची मराठवाड्याला ओळख आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुखावलेले जयदत्त क्षीरसागर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली. त्यामुळे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेऊन मंत्रिमंडळात संधी दिली आहे.