महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियती कोणाला माफ करत नसते; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल - BJP

राष्ट्रवादीचे किल्ले कोसळत आहेत, बुरूज ढासळत आहेत. नियती कोणाला माफ करत नसते, असा हल्लाबोल राष्ट्रवादीवर जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.

जयदत्त क्षीरसागर

By

Published : Oct 1, 2019, 10:58 PM IST

बीड- शिवसेनेत आल्यापासून मनस्वी आनंद होत आहे. आपले सर्व कार्यक्रम हाऊसफुल्ल होत आहेत. तिकडे उलटे चित्र पाहण्यास मिळत आहे. सगळी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे किल्ले कोसळत आहेत, बुरूज ढासळत आहेत, शिल्लक कोणी राहिले का हे तपासले जात आहे, महायुती होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले होते. परंतु नियती कोणाला माफ करत नसते, असा हल्लाबोल राष्ट्रवादीवर जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.

हेही वाचा - अप्रत्यक्ष भाजपला मदत करणारे प्रत्यक्ष मदतीसाठी भाजपात गेले -धनंजय मुंडे

क्षीरसागर म्हणाले, महायुतीचा निर्णय झाला, आता महायुतीचेच सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. आदित्य ठाकरे निवडणुकीत उतरल्याने मोठा उत्साह संचारला आहे. मंत्रालयाचा सहावा मजला त्यांची वाट पाहत आहे. बीड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गुरूवारी सकाळी अकरा वाजता भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या अनुषंगाने आज (मंगळवार) पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले.

हेही वाचा - 'आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार?'


यावेळी जयदत्त क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले, आता आपल्याला महाराष्ट्र आणि तहानलेला मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. शिवसेनेने मला प्रवेश दिला. मंत्रीपद दिले, आता उमेदवारीही दिली. कमी षटकात जास्त धावा करण्याचे काम आपल्याकडे दोन महिन्यात झाले.

हेही वाचा - अखेर मुंदडा कुटुंबीय भाजपात दाखल; केजमध्ये संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले?

यावेळी जिल्हाप्रमुख कूंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - परळीत 15 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या बदल्या करा; मुंडेची निवडणूक आयोगाकडे तक्रार


अर्ज भरण्याची नव्हे तर विजयी मिरवणूक असेल
जयदत्त क्षीरसागरांनी आता हाती धनुष्यबाण घेतले आहे. गळ्यात भगवा आणि हातात विजयी ध्वज घेऊन गुरूवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसैनिकांनी ताकदीने यायचे. परिवर्तन घडवून आणायचे आहे. भागा भागात, वाडी वस्तीत, गावा-गावात काम करायचे आहे, हेवे दावे विसरायचे आहेत. उज्वल भविष्य आपली वाट पाहतंय, जयदत्त क्षीरसागरांच्या मताधिक्याचा दरारा निर्माण झाला पाहिजे, ही भगवी ताकद गुरूवारी दाखऊन द्यायची आहे, ती ताकद अर्ज भरण्याची नव्हे तर विजयी मिरवणुकीची असेल असा आशावाद शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details