महाराष्ट्र

maharashtra

'शरद पवारांच्या सल्ल्याने यशस्वी राज्यकारभार करू'

By

Published : Jan 25, 2020, 4:25 PM IST

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे दिवंगत सुंदरराव सोळंके यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोलंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड यांची उपस्थिती होती.

अजित पवार
अजित पवार

बीड- राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री, 2 वेळा कृषिमंत्री तर देशाचे संरक्षण मंत्री म्हणून कामाचा अनुभव असलेल्या शरद पवारांचे महाविकास आघाडीला मार्गदर्शन आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाभिमुख राज्यकारभार करू. कोणी विरोधकांनी चिंता करण्याची गरज नाही, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बीडमध्ये लगावला.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे दिवंगत सुंदरराव सोळंके यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोलंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड यांची उपस्थिती होती.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

हेही वाचा - बीडमध्ये भाजपची खांदेपालट, जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्केंची नियुक्ती

नोकरी देणारे म्हणून सुंदरराव सोळंके यांची ओळख होती. आजच्या राजकारण्यांनी सुंदरराव सोळके यांचा आदर्श घ्यावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सहकार, शिक्षण, आणि राजकारणात आदर्श व्यक्ती म्हणून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सोळके यांचे काम मोलाचे आहे.

दिवंगत सोळंके आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कामात बरचसे साम्य होते. दोघेही जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. सुंदरराव सोळके यांच्या कार्याच्या वारसा प्रकाश सोळंके पुढे चालवत आहेत, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा -पंकजा मुंडे यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात; बंड थंड झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details