महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; पंक्चर काढताना घडली घटना - रुग्णवाहिका

किशोर शंकर कंकरे (२८, रा.भंडगवाडी, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. किसन हा सोमवारी सकाळी जीपने क्र. (एम.एच.४४ जी.२५७९) माजलगावकडे निघाला होता. दरम्यान, माजलगाव-गढी रस्त्यावरील माऊली फाटा येथे जीप अचानक पंक्चर झाली.

अपघातानंतर रस्त्यावर पडलेला मृतदेह.

By

Published : Jun 18, 2019, 7:57 PM IST

बीड - जीपचे पंक्चर काढताना चालकास मदत करणाऱ्या तरुणाला भरधाव दुचाकीने उडवले. यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावरील माऊली फाट्यावर घडली.

अपघातानंतर रस्त्यावर पडलेला मृतदेह.

किशोर शंकर कंकरे (२८, रा.भंडगवाडी, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. किसन हा सोमवारी सकाळी जीपने क्र. (एम.एच.४४ जी.२५७९) माजलगावकडे निघाला होता. दरम्यान, माजलगाव-गढी रस्त्यावरील माऊली फाटा येथे जीप अचानक पंक्चर झाली. जीप चालकाला पंक्चर काढण्यास मदतीसाठी किशोर खाली उतरला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने (क्र.एम.एच.२१ बीओ.०९१३) त्यास जोराची धडक दिली. यात किशोरच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details